लायकेन प्लॅनस (Lichen Planus)

अंगावर खाज येणारे चट्टे, पुरळ किंवा तोंडात पांढरे डाग दिसतायत का?

अंगावर अचानक लालसर-जांभळे चट्टे आले, खाज सुटली, किंवा तोंडाच्या आत पांढऱ्या जाळीसारख्या रेषा दिसायला लागल्या, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

कधी कधी या लक्षणांमागं लायकेन प्लॅनस (Lichen Planus) नावाचा त्वचेचा आजार असू शकतो.

घाबरायची गरज नाही; पण वेळेत तपासणी करून घेणं महत्त्वाचं हाय.

लायकेन प्लॅनस काय असतं?

लायकेन प्लॅनस हा त्वचा, तोंड, नखं किंवा शरीराच्या काही नाजूक भागांवर होणारा दाहाचा आजार हाय.

हा आजार संसर्गजन्य नाही. म्हणजे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला तो लागत नाही.

याची लक्षणं कशी दिसतात?

लायकेन प्लॅनसमध्ये खालीलपैकी काही त्रास दिसू शकतो—

🔹 अंगावर लालसर किंवा जांभळट चट्टे

🔹 चट्ट्यांवर खूप खाज सुटणं

🔹 मनगट, पाय, घोटे अशा ठिकाणी पुरळ येणं

🔹 तोंडात पांढऱ्या जाळीसारख्या रेषा दिसणं

🔹 तोंडात जळजळ होणं किंवा दुखणं

🔹 नखांमध्ये बदल होणं

🔹 टाळूवर केस कमी होणं किंवा केस गळणं

🔹 शरीराच्या नाजूक भागात खाज-जळजळ होणं

प्रत्येकाला सगळीच लक्षणं असतील असं नाही.

तोंडात पांढरा डाग दिसला म्हणजे फंगल इन्फेक्शनच असतं का?

नाही.

तोंडात पांढरे डाग दिसले की बरेच जण लगेच फंगल इन्फेक्शन समजून औषधं सुरू करतात.

पण त्यामागं Oral Lichen Planus किंवा इतर कारणंही असू शकतात.

म्हणून अंदाजानं औषधं घेण्यापेक्षा त्वचारोग तज्ज्ञाकडं तपासणी करून घेणं जास्त योग्य हाय.

लायकेन प्लॅनसचा इलाज होतो का?

हो, यावर उपचार करता येतात.

मात्र कोणता इलाज करायचा हे आजार कुठं हाय, किती वाढलाय आणि किती तीव्र हाय, यावर ठरतं.

योग्य उपचारानं—

✅ खाज आणि जळजळ कमी करता येते

✅ नवीन पुरळ येणं आटोक्यात आणता येतं

✅ त्वचेचा दाह कमी करता येतो

✅ तोंडाचा त्रास कमी करता येतो

✅ पुढचे त्रास टाळण्यासाठी नियमित तपासणी करता येते

काही जणांमध्ये आजार हळूहळू कमी होतो, तर काहींना जास्त काळ उपचार आणि नियमित follow-up लागतो.

चट्टे गेले, पण काळे डाग राहिले तर?

हे बऱ्याच रुग्णांमध्ये दिसतं.

पुरळ बरा झाल्यानंतर त्वचेवर काळसर डाग राहू शकतात. आपल्या भारतीय त्वचेत हे डाग तुलनेनं जास्त काळ दिसू शकतात.

म्हणून फक्त पुरळ कमी करणं नाही, तर नंतर राहिलेल्या डागांचीही योग्य काळजी घेणं महत्त्वाचं हाय.

कधी डॉक्टरांकडं जावं?

तुम्हाला जर—

“अंगावर खाज येणारे लाल-जांभळे चट्टे वारंवार येतायत…”

“तोंडात पांढऱ्या जाळीसारख्या रेषा दिसतायत…”

“पुरळ गेल्यावर काळे डाग राहून जातायत…”

“नखांमध्ये किंवा केसांमध्ये अचानक बदल जाणवतोय…”

—तर उगाच घरगुती उपाय करत बसू नका.

एकदा त्वचारोग तज्ज्ञाकडं तपासणी करून घ्या.

कारण समजलं, तर इलाजाची दिशा सापडते!

लायकेन प्लॅनसची लक्षणं इतर काही त्वचारोगांसारखी दिसू शकतात.

म्हणून फक्त बाहेरून दिसतंय म्हणून स्वतःहून औषधं घेण्यापेक्षा योग्य तपासणी करून आजाराचं निदान करणं महत्त्वाचं हाय.

काही रुग्णांमध्ये निदान पक्कं करण्यासाठी Skin Biopsy सारखी तपासणी करावी लागू शकते.


🩺 Korde Skin Clinic

त्वचारोग व सौंदर्य विकारांसाठी तज्ज्ञ सल्ला

डॉ. गणेश शामराव कोरडे

B.A.M.S. | Certificate in Clinical Dermatology

📍 वाशीम

“त्वचेवर काही बदल जाणवत असतील, तर दुर्लक्ष करू नका.**

वेळेत तपासणी करा आणि योग्य उपचाराची सुरुवात करा.”